Ladki Bahin Yojana April Salary | लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज…! एप्रिलचा हफ्ता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार, 1500 मिळणार की 2100?

Ladki Bahin Yojana April Salary | लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज…! एप्रिलचा हफ्ता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार, 1500 मिळणार की 2100?

Ladki Bahin Yojana April Salary: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली असून मार्च 2025 पर्यंत या योजनेअंतर्गत नऊ महिन्यांचा लाभ मिळाला आहे.

म्हणजेच ज्या महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांना आतापर्यंत 13,500 मिळाले असतील. दरम्यान आता या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. खरंतर, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा लाभ मार्च महिन्यात देण्यात आला.

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा केलेत. दरम्यान आता या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भात नवीन माहिती समोर येत आहे.

Grampanchayat Budget | ग्रामपंचायतीने गावासाठी सरकारी निधीतून किती पैसा खर्च केला? हे कसं तपासायचं? जाणून घ्या सविस्तर

लाडक्या बहिणींना कधी मिळणार लाभ?

8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने फेब्रुवारी आणि मार्चचा हफ्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा 8 मार्च रोजी म्हणजे महिला दिनी देण्यात आला होता.

आणि त्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसात मार्च महिन्याचा पैसा देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यामुळे आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत ती एप्रिल महिन्याच्या पैशांची.

दरम्यान एप्रिल महिन्याचा पैसा सहा ते दहा एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Business Idea | हा व्यवसाय सुरू करून दररोज 2000 रुपये कमवा, तो कसा सुरू करायचा ते पहा.

Ladki Bahin Yojana April Salary : मात्र याबाबत सरकारकडून अजून अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे या तारखांनाच पुढील हप्ता जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. पण या योजनेचा पैसा काही महिलांना मिळणार नाहीये. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली होती.

ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झाली आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, पण या योजनेत एकूण 50 लाख महिला अपात्र होण्याची शकता असून आतापर्यंत 9 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना या महिन्यात योजनेचा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment