Grampanchayat Budget | ग्रामपंचायतीने गावासाठी सरकारी निधीतून किती पैसा खर्च केला? हे कसं तपासायचं? जाणून घ्या सविस्तर

Grampanchayat Budget | ग्रामपंचायतीने गावासाठी सरकारी निधीतून किती पैसा खर्च केला? हे कसं तपासायचं? जाणून घ्या सविस्तर

Grampanchayat Budget : आपल्या गावासाठी ग्रामपंचायत किती निधी मंजूर करते आणि तो कसा खर्च केला जातो, याची माहिती अनेकांना माहित नसते. बहुतांश नागरिकांना त्यांच्या गावाच्या अर्थसंकल्पाची स्पष्ट कल्पना नसल्यामुळे, ग्रामपंचायतीचा निधी, त्याचे वितरण आणि त्याचा वापर याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

आपल्या गावासाठी ग्रामपंचायत किती निधी मंजूर करते आणि तो कसा खर्च केला जातो, याची माहिती अनेकांना नसते. बहुतांश नागरिकांना त्यांच्या गावाच्या अर्थसंकल्पाची स्पष्ट कल्पना नसल्यामुळे, ग्रामपंचायतीचा निधी, त्याचे वितरण आणि त्याचा वापर याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

गावाचा अर्थसंकल्प कसा ठरतो?

Grampanchayat Budget : दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ग्रामविकास समितीची बैठक घेतली जाते. या बैठकीत आरोग्य, शिक्षण, महिला कल्याण, स्वच्छता अशा विविध विषयांवर चर्चा केली जाते. त्यानंतर, गावाकडे असलेल्या निधीचा अंदाज घेतला जातो आणि सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या अपेक्षेनुसार अंदाजपत्रक तयार केले जाते.

Business Idea | हा व्यवसाय सुरू करून दररोज 2000 रुपये कमवा, तो कसा सुरू करायचा ते पहा.

तज्ज्ञांच्या दिलेल्या माहितीनुसार, “ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाचा मसुदा 31 डिसेंबरपूर्वी पंचायत समितीकडे सादर करावा लागतो. पंचायत समिती हे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवते.”

ग्रामपंचायतीला निधी कुठून मिळतो?

ग्रामपंचायतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांद्वारे निधी उपलब्ध केला जातो. एकूण 1100 हून अधिक योजनांमधून विविध गावांना अनुदान दिले जाते. एखाद्या गावासाठी कोणती योजना लागू होईल, हे त्या गावाच्या जिल्हा आणि भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते.राज्य सरकारी योजनांसाठी 100% निधी राज्य सरकार पुरवते. तर केंद्र सरकारच्या योजनांसाठी 60% निधी केंद्र सरकार देते आणि उर्वरित 40% निधी राज्य सरकारकडून दिला जातो.

ग्रामपंचायतीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ई-ग्राम स्वराज’ अ‍ॅप

23 एप्रिल 2020 रोजी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ई-ग्राम स्वराज’ हे मोबाईल अ‍ॅप लाँच केले. याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते की,”या अ‍ॅपच्या मदतीने ग्रामपंचायतीला मंजूर झालेला निधी, त्याचा वापर कोणत्या कामांसाठी करण्यात आला, याची माहिती नागरिकांना सहज मिळेल. गावातील नागरिकांना आपल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजाची कल्पना यावी, यासाठी हे अ‍ॅप महत्त्वाचे आहे.”

ग्रामपंचायतीचा खर्च तपासण्याची पद्धत

1) ‘ई-ग्राम स्वराज’ अ‍ॅप डाउनलोड करा – गुगल प्ले स्टोअरवरून ‘e-Gram Swaraj’ अ‍ॅप डाउनलोड करा.अ‍ॅप उघडल्यानंतर राज्य, जिल्हा, पंचायत समिती आणि गावाचे नाव निवडा. माहिती भरून ‘सबमिट’ करा.

2) तसेच अ‍ॅपमध्ये खालील तीन पर्याय दिसतात.

या सोप्या पद्धतीने तुम्हाला व्यवसायासाठी ₹50,000 ते ₹10 लाखापर्यंतचे कर्ज मिळेल का?

  • ER Details – ग्रामपंचायतीतील निवडून आलेल्या सदस्यांची माहिती.
  • Approved Activities – मंजूर विकासकामांचा तपशील.
  • Financial Progress – आर्थिक व्यवहार आणि खर्चाचा अहवाल.

ग्रामपंचायतीला किती निधी मिळतो आणि खर्च कसा होतो?

‘Financial Progress’ या पर्यायावर क्लिक केल्यावर निवडलेल्या आर्थिक वर्षात गावासाठी मंजूर झालेला निधी (Receipt) आणि त्याचा खर्च (Expenditure) याचा तपशील पाहता येतो.

  • त्यात खालील माहिती दिली जाते जसे की,
  • गावासाठी मंजूर निधी किती?
  • त्यातील किती निधी प्रत्यक्षात खर्च झाला?
  • कोणत्या योजनेंतर्गत किती रक्कम खर्च झाली?
  • ग्रामपंचायतीने निधी खर्च केला नाही तर?

Grampanchayat Budget : दरम्यान, गावाचा विकास योग्य वेळी व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या निधी आणि खर्चावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ‘ई-ग्राम स्वराज’ अ‍ॅपचा वापर करून प्रत्येक नागरिक आपल्या गावाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळवू शकतो. निधीचा योग्य वापर झाला की गावाचा सर्वांगीण विकास होईल आणि पारदर्शकता टिकून राहील.

Leave a Comment