Ration card e-kyc process | घरबसल्या रेशन कार्ड E-KYC कशी करायची? स्टेटस कसं चेक करायचं? पहा..!

Ration card e-kyc process | घरबसल्या रेशन कार्ड E-KYC कशी करायची? स्टेटस कसं चेक करायचं? पहा..!

Ration card e-kyc process : महाराष्ट्रातील NFSA धान्य मिळत असलेल्या शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी eKYC करण्यासाठी.मेरा ई-केवायसी ॲप आता कार्यरत आहे. आता NFSA लाभार्थी काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे KYC पूर्ण करू शकतात. प्रक्रिया त्रासमुक्त आहे आणि चेहरा प्रमाणीकरण वापरते.हे करण्यासाठी लाभार्थी सदस्याच्या आधार क्रमांकास मोबाईल नंबर लिंक केलेला असावा लागतो.

लाभार्थ्यांनी खालील दोन ॲप्स डाउनलोड करणे आवश्यक आहे.

  • मेरा ई-केवायसी ॲप
  • आधार फेस आरडी सेवा ॲप

खालील लिंक्सवरून ॲप्स डाउनलोड करा.

Ration card e-kyc process 2025 : कार्डधारकांना विनंती आहे आपल्या कुटुंबातील eKYC करायचे सदस्य राहिलेले असतील तर त्यांची eKYC करुण घ्यावी.जर आपण eKYC केलीच नाही तरं शासन स्तरावरून आपले नाव शिधापत्रिकेमधून वगळल्यास कमी झाल्यास किंवा शिधापत्रिका रदद झाल्यास यास सर्वस्वी स्वतः शिधापत्रिका धारक कुटुंब जबाबदार राहतील.

रेशन कार्ड ई-केवायसी कशी तपासावी?

ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया वापरता येईल.

  • मेरा राशन ॲप डाऊनलोड करा: सर्वांत अगोदर Google Play Store वर जाऊन “Mera Ration” ॲपडाऊनलोड करा.
  • ॲप मध्ये माहिती भरा: ॲप उघडल्यावर तुम्हाला शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल. तुमच्या सोयीनुसार कोणताही एक पर्याय निवडा.
  • आधार सिडिंग तपासा: माहिती सबमिट केल्यानंतर “आधार सिडिंग” पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे “Yes” किंवा “No” असे ऑप्शन दिसतील.
  • Yes: याचा अर्थ त्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण आहे.
  • No: याचा अर्थ त्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण करावी लागेल.

Leave a Comment